ईशान खट्टरनं ‘या’ सिनेमासाठी लावली जीवाजी ‘बाजी’, सुरक्षेशिवाय केले सगळे ‘स्टंट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजचा युवा कलाकार शुटींग करताना अनेक अडचणींचा सामना करायला तयार असतो. याद्वारे त्यांची इंडस्ट्रीतील प्रोफाईलही स्ट्राँग होते यात काही शंका नाही. 2017 साली आलेल्या Beyond the Clouds आणि 2018 साली आलेल्या धडक या सिनेमात आपला जलवा दाखवणारा अभिनेता ईशान खट्टरही या रेसमध्ये वेगानं धावताना दिसत आहे.

ईशानन आपला आगामी सिनेमा खाली पीलीच्या क्लायमॅक्स सीन्ससाठी अ‍ॅक्शन सीन शुट केले. खास बात अशी की, कोणत्याही केबलशिवाय आणि स्टंट डबलशिवाय त्यानं हे स्टंट केले आहेत. सिनेमाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर परवेज शेख म्हणाले, “ईशाननं स्वत:च सगळे स्टंट केले आहेत. तेदेखील कोणत्याही केबल किंवा सुरक्षेशिवाय. खरंतर ईशाननं मला विनंती केली की सगळे स्टंट तो करेल. नंतर मीही त्याला सहमती दाखवली.”

View this post on Instagram

#KhaaliPeeli 🚕💥

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही ब्रीजवर कोणाचा पिछा करतानाचा सीन शुट करत होतो आणि यात ईशानला आपली टॅक्सी चालवायची होती. यानंतर एका पॉईंटवर थांबून त्याला लढायचं होतं. भलेही टॅक्सीचा स्पीड आणि टेक्नॉलॉजी आजच्या कारसोबत मिळती जुळती नाहीये तरीही त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं कार चालवली. खाली पीली या सिनेमात ईशान मुंबईच्या कारचालकाची भूमिका साकारत आहे. या सिनेमात अनन्या पांडेही दिसणार आहे.”

You might also like