IT Raid In Nashik | नाशिकमध्ये आयटीची धाड, 500 च्या नोटांचा ढीग, 26 कोटीची रोकड जप्त, 30 तासांच्या आयटी रेडमुळे खळबळ (Video)

नाशिक : IT Raid In Nashik | नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांत तणावाचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाची ही कारवाई तब्बल ३० तास सुरूहोती. या कारवाईसाठी नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. या छाप्यात एकूण २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली.

जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तास लागले आहेत. तसेच जप्त केलेली रक्कम आणि मालमत्तांचे दस्तावेज यासाठी प्राप्तिकर विभागाच्या सात कार छापेमारीच्या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. (IT Raid In Nashik)

आयटीच्या कारवाईत नाशिक शहरातील सराफा व्यापाऱ्याकडे इतके मोठे बेहिशोबी घबाड सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत नाशिकसह नागपूर आणि जळगावचे अधिकारी सहभागी झालेले असल्याने व्यापाऱ्यांत सध्या तणावाचे वातावरण आहे.
आता पुढील कारवाई कोणावर याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
काही दिवसापूर्वी आयटीने नांदेडमध्ये अशीच कारवाई केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)