Coronavirus : इटलीमध्ये तुटलं मृत्यूचं रेकॉर्ड ! 24 तासात 1000 जण ‘कोरोना’चे बळी, अमेरिकेत 18 नवे ‘रुग्ण’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 195 देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. 26 हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीने बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. एका दिवसांत इटलीमध्ये 969 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आणखी 26 हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतही आपली पायामुळे खोलवर रोवण्यास सुरुवात केली असून मागील 24 तासांत 18 हजार नवे रूग्ण तेथे आढळले आहेत.

इटलीमध्ये कोरोनाने एका दिवसांत 969 जणांचा बळी घेतला. या यादीत इटलीनंतर इराण आणि स्पेनचा क्रमांक लागलो. एका दिवसात इराणमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, स्पेनने 569 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे इटलीमध्ये आतापर्यंत करोनाच्या प्रदुर्भावामुळे 51 डॉक्टरांचा समावेश आहे. इटलीमध्ये एका दिवसांत 969 नागरिकांचा बळी गेला आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 9134 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश असणार्‍या अमेरिकेलाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत 18 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना विषाणूच्या चपाट्यात आतापर्यंत 97 हजार अमेरिकन आले आहेत. न्यूयार्कमध्ये 512 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 1477 जणांचा बळी घेतला आहे.