CBDT नं सुमारे 88,652 कोटींचा Tax केलाय रिफंड, अधिक माहितीसाठी ‘या’ पार्टलला भेट द्या

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 21 ऑगस्ट : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्ससेशन विभाग अर्थात CBDT ने सुमारे 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड केला आहे. जर कोणाला याचा परतावा मिळाला नसेल तर, ह्या विभागाशी संपर्क साधून अथवा या संबंधित पोर्टलवर याची माहिती आपणास मिळू शकेल.

इन्कम टॅक्स विभागाने यंदा आत्तापर्यंत करधारकांना 88 हजार 652 कोटींचा कर परतावा दिलाय. यातील 23.05 लाख करधारकांना 28,180 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, 1.58 लाख कॉर्पोरेट टॅक्सधारकांना 60,472 कोटी रुपये रिफंड मिळाले आहेत.

याची माहिती आयकर विभागाने शुक्रवारी एका ट्विटद्वारे दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिलाय. 23,05,726 प्रकरणांमध्ये 28,180 कोटी रुपयांचा आयकर परतावा दिला आहे. तसेच 1,58,280 प्रकरणात 60,472 कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आला आहे, असेही या विभागाने सांगितले आहे.

काही बाबींची काळजी घेतली तर सगळ्यांनाच आपल्याला परतावा मिळाला किंवा नाही, याची माहिती कळणार आहे. आपले पोर्टल प्रोफाइल उघडताच आपल्याला View returns/forms’ वर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returnsवर क्लिक करून सबमिट करावे. हायपरलिंक एनरोलमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल.

त्यावर आपल्याला फाइल रिटर्न भरण्याची वेळ प्रक्रिया, कर परताव्याची माहिती आहे. यात दाखल करण्याच्या तारखेची माहिती, परताव्याची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा मिळण्याची तारीख आणि देय परतावा याविषयी माहिती आहे. जर आपला रिफंड मिळाला नसेल तर त्याचं कारण देखील यावर आपल्याला कळणार आहे, असेही या विभागाने सांगितले आहे.