‘हा माझा सन्मान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा सन्मान आहे,’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.

पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानले आहेत.

गेल्या विधानसभेत धनंजय मुंडे यांच्यापासून पराभव झाल्यानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना कोणती जबाबदारी मिळणार याची चर्चा सुरु होती. विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. पण पक्षाने तसे न करता नव्यांना संधी दिली. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं होत. त्याचं अनुषंगाने त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like