राम मंदिरासाठी 81 वर्षाच्या महिलेनं 28 वर्षापासून नाही खाल्लं अन्न, केला होता संकल्प

ADV

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   राम मंदिराच्या बांधण्यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने जो संकल्प घेतला होता, तो आता पूर्ण झाला आहे. जबलपूर येथील रहिवासी 81 वर्षीय उर्मिला चतुर्वेदी यांनी 28 वर्षांपूर्वी वादग्रस्त रचना कोसळल्यानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत त्या भोजन स्वीकारणार नाही असा संकल्प घेतला होता आणि आता 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार असल्याने त्यांचा संकल्प पूर्ण होताना दिसत आहे.

1992 मध्ये जेव्हा रचना कोसळली तेव्हा उर्मिला चतुर्वेदी 53 वर्षांच्या होत्या. रचना कोसळल्यानंतर जेव्हा देशात दंगली झाल्या, तेव्हा दुखावल्या गेलेल्या उर्मिला यांनी संकल्प केला होता कि, ज्या दिवशी मंदिराचे बांधकाम प्रत्येकाच्या संमतीने सुरू होईल, त्यादिवशी त्या अन्न ग्रहण करतील. त्यांच्या कुटुंबीयांनी बर्‍याच वेळा त्यांना विनंती केली होती की, आपण आहार सोडण्याचा निर्धार रद्द करा, परंतु उर्मिला यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि तेव्हापासून त्यांनी अन्न स्वीकारले नाही आणि केवळ फलाहार करीत आहेत. उर्मिला यांच्या घरी एक राम दरबार आहे, जिथे त्या दररोज राम नावाचा पाठ देखील करतात.

ADV

आता जेव्हा 5 ऑगस्टला मंदिर भूमिपूजन होणार आहे, तेव्हा उर्मिला चतुर्वेदी यांची इच्छा आहे की, अयोध्येत रामलल्ला पाहिल्यानंतरच त्या आपल्या संकल्प सोडतील, परंतु हे शक्य होणार नाही असे दिसते, कारण 5 ऑगस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अयोध्येत जाण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचे म्हणणे आहे की, घरी बसून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.