17 वर्षापासून ‘हे’ रेकॉर्ड कोणीही ‘मोडले’ नाही, केवळ 5 जणांनी केली ‘अश्चर्यकारक’ कामगिरी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक रुडोल्फने 17 वर्षापूर्वी आजच्या दिवशी पहिल्याच कसोटी सामन्यात खळबळ उडवून दिली होती. 26 एप्रिल 2003 मध्ये बांग्लादेशाविरुद्ध खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात जॅक याने स्फोटक फलंदाजी करत नाबाद 222 धावांची खेळी केली. यासह जॅक रुफोल्डने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत दुहेरी शतक झळकावणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला. जॅकच्या अगोदर चार फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. जॅक हा पाचवा खेळाडू ठरला.

फलंदाज या विक्रमापासून दूर

जॅक रुडोल्फच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकवल्यानंतर 17 वर्षापासून जगातील कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम मोडला नाही. रुडोल्फच्या नंतर एकाही फलंदाजाला पहिल्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक ठोकता आले नाही. या सामन्यात रुडोल्फने बोएता डिप्पेनर (177*) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात बांग्लादेशाला डाव आणि 60 धावांनी पराभव केला.

जॅक रुडोल्फने दक्षिण आफ्रिकेकडून 48 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 6 शतके आणि 11 अर्धशतकांसह 2 622 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून जॅकने एकदिवसीय सामन्यात एका अर्धशतकासह 1174 धावा केल्या आहेत.

या 5 फलंदाजांनी केली अशी कामगिरी

इंग्लंड क्रिकेट संघाचा रेजिनाल्ड फॉस्टर हा कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज होता. फॉस्टरने 1903 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 287 धावांची खेळी केली होती. यानंतर 69 वर्षानी वेस्ट इंडीजच्या लॉरेन्स रोवेन याने न्युझिलंडविरुद्धच्या पदार्पणात कसोटी सामन्यात पहिल्या डावात 214 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 1987 मध्ये श्रीलंकेच्या ब्रेन्डन केरप्पूने डेब्यू याने कसोटी सामन्यात न्युझीलंडविरुद्ध नाबाद 201 धावा केल्या. न्युझिलंडच्या मॅथ्या रिन्क्लेअरने 1999 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 214 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2003 मध्ये बांगलादेशाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जॅक रुडोल्फने 222 धावा केल्या.