भारत-पाकिस्तान सीमेवरचा विरेंद्र सेहवागने केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – वीरेंद्र सेहवाग म्हटलं की आपल्याला आठवते ती त्याची मैदानावरची धडाकेबाज फलंदाजी. जरी सेहवागने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली असली तरी त्याची सोशल मीडियावर बॅटिंग चालूच असते. आता सेहवागने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो भरपूर व्हायरल होत आहे. कोरोनाने सगळीकडे चांगलंच थैमान घातलं असून हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर खूप बिकट परिस्थिती निर्माण होईल. पण अशा परिस्थितीत देखील भारतीय जवान डोळयांत तेल घालून सीमेवर गस्त घालत आहेत. हा व्हिडिओ भारतीय जवानांचाच आहे. पाच भारतीय जवान भारत आणि पाकिस्तान सीमेवर एका ठिकाणी भांगडा करताना दिसून येत आहेत.

 

 

 

 

 

सेहवागने शेअर केलेला हा व्हिडिओ खूप उत्साहवर्धक आहे. सेहवागने हा व्हिडिओ शेअर करून त्याखाली काही ओळीदेखील लिहल्या आहेत. यामध्ये असं लिहलं आहे की,” भारत-पाकिस्तानच्या सीमेवर भांगडा करून भारतीय जवान आंनद घेत आहेत. हे पाहताना मला खूप आनंद होत आहे आणि त्यांची एनर्जीही कमाल आहे. जय जवान!

हा व्हिडीओ सेहवागने शेअर केल्यापासून तो भरपूर व्हायरल होत आहे. आनंदी राहण्यासाठी तंदुरुस्त राहिलं पाहिजे असं सांगितलं जातं. डान्स केल्याने आपण तंदुरुस्त राहतो, असंच काहीतरी या जवानांना सांगायचं दिसतंय. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. भारतीय जवानांना सीमेवर अहोरात्र काम करावं लागतं. त्यामुळे तणाव झटकण्यासाठी जवान नेहमी काहीतरी शक्कल लढवत असतात. हा डान्सदेखील यातलीच एक शक्कल असल्याचे दिसून येते.