×
Homeक्राईम स्टोरीJalna Crime | धक्कादायक! अल्पवयीन मुलीने साडेपाच वर्षाच्या चुलत बहिणीवर ब्लेडने वार...

Jalna Crime | धक्कादायक! अल्पवयीन मुलीने साडेपाच वर्षाच्या चुलत बहिणीवर ब्लेडने वार करुन केला खून

जालना: पोलीसनामा ऑनलाइन – Jalna Crime | जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगरामध्ये साडेपाच वर्षाच्या मुलीच्या गळ्यावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.28) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ईश्वरी रमेश भोसले (वय साडेपाच वर्ष) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी आली होती. ईश्वरीचे आई-वडील घनसांगवी तालुक्यातील गुंज येथे शेती करतात. याप्रकरणी (Jalna Crime) पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आठवडाभर शाळेत गैरहजर असलेल्या 14 वर्षीय मुलीला पालकांनी शाळेत जाण्याचा तगादा लावल्याने संतापाच्या भरात तिने आपल्या पाच वर्षीय चुलत बहिणीचा बाथरूम मध्ये कोंडून ब्लेडने गळ्यावर वार करून खून केल्याची माहिती मिळत आहे.(Jalna Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना 112 वर फोन आला होता की, जालना शहरातील चौधरी नगर भागात एका घरातील बाथरुममध्ये मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्य़ंत जखमी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी ईश्वरीच्या हातावर आणि गळ्यावर जखमा दिसल्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात जाताच ईश्वरीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या हृदयद्रावक घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,
तालुका पोलीस ठाण्याचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.
प्राथमिक अंदाजावरून हा खून लहान व्यक्तीने केला आहे. त्याने घरामध्ये येऊन कपडेही बदलले आहेत.
तसेच बाथरुम मध्ये पाणी टाकून रक्ताने माखलेले बाथरुम स्वच्छ केल्याचे दिसून आले.
घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाचे ठसे घरात जागोजागी दिसत आहेत.
ईश्वरीचे काका गणेश भोसले हे प्रयोगशाळा चालवतात.
त्यामुळे दिवसभर त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि त्यांची इतर दोन मुले राहतात. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Jalna Crime | a five and a half year old girl was stabbed to death with a blade in jalna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Must Read
Related News