जम्मू-कश्मीर : शोपियांमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज सकाळी शोपीयन प्रांतातील कुटपोरा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये आज(मंगळवार) सकाळपासून सुरु असणारी चकमक अद्यापही सुरूच आहे. काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल एकत्रितपणे या कारवाईमध्ये सहभागी झाले.

बीएसएफच्या माहितीनुसार, पोलीस, लष्कराच्या 34आरआर आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त टीमने शोधमोहीम सुरू केली होती. शोपियांमधील कुटपोरा भागात घुसघोर दबा धरून दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. जवानांची चाहूल लागतच परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला होता. या दहशतवाद्यांना अगोदर आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर त्यांचा खात्मा करण्यात आला.

काही दिवसात बर्फवृष्टीला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर काश्मीरमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी आहेत. मध्यरात्री हे दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यावेळी दोन एके-४७ रायफल, एक पिस्तूल, एक रेडीओ सेट आणि ५० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. नोव्हेंबरला मचीलमध्ये झालेल्या चकमकीमध्ये चार लष्कराचे चार जवानांना वीरमरण आले होते तर, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.