J & K : दोन दिवसात 2 सरपंचावर हल्ला, 24 तासात भाजपाच्या 4 नेत्यांनी सोडला पक्ष

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत भारतीय जनता पक्षाच्या चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे. कुलगाम देवसरच्या भाजपा सरपंचांनी आज राजीनामा दिला. दरम्यान, भाजप नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसेन पाला यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसेन पाला यांनी वैयक्तिक कारणास्तव भाजप सोडल्याचे सांगत म्हंटले कि, आज त्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. जर त्यांच्यामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

दहशतवाद्यांनी आज भाजप सरपंचाची केली हत्या
भाजप नेत्यांच्या राजीनाम्यामागे कुलगाममध्ये सरपंचावर झालेला प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. आज कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेसू गावचे भारतीय जनता पक्षाचे सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. भाजपच्या सरपंचांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काल भाजपा पंच आरिफ अहमद यांच्यावर हल्ला
भाजपचे सरपंच सजाद अहमद यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी काजीगुंड अखरानमध्ये भाजपा पंच आरिफ अहमदवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आरिफ अहमद गंभीर जखमी झाले. सरपंचांवर हल्ला झाल्याने भाजप नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतरच भाजप नेते राजीनामा देत असल्याचा विश्वास आहे.

राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी मागितली माफी
दरम्यान, राजीनामा देणारे नेत्यांचे म्हणणे आहे की, ते भाजपाचे क्रियाकलाप करण्यास वेळ काढू शकत नाही, म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून आमचा भाजपाशी काही संबंध नाही. जर त्यांच्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर ते दिलगीर व्यक्त करीत आहोत.