दहशतवाद्यांना मदत करणारा काश्मीरचा DSP देवेंद्र सिंह ‘बडतर्फ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गाडीत काश्मीरचे डीएसपी देवेंद्र सिंह हे दिसल्याने मोठा वाद चिघळला होता. डीएसपीच देवेंद्र सिंह हे दहशतवाद्याच्या गाडीत असल्याने मोठा धक्का बसला होता, त्यानंतर आज काश्मीरमध्ये दहशतवाद्याबरोबर पकडल्या गेलेल्या डीएसपी देवेंद्र सिंह यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

देवेंद्र सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांनी जम्मू आणि काश्मीर पोलिसातून बरखास्त करण्यात आले आहे. या संबंधित एक आदेश देखील जारी करण्यात आला. देवेंद्र सिंह हे शनिवारी दोन दहशतवाद्याबरोबर वाहनांच्या नाकाबंदीत पकडले गेले होते. काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते.

संसदेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या प्रकरणात देखील ते तपास यंत्रणेच्या रडारावर होते. सध्या एनआयए त्यांची चौकशी करत आहेत. त्यांचे श्रीनगर विमानतळाजवळील स्थित कार्यालय देखील सील करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/