धक्‍कादायक ! OLX वर ‘नवजात’ बाळ विक्रीला, कारण जाणून व्हाल ‘हैराण-परेशान’

जमशेदपूर : वृत्तसंस्था – अशी एक बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्हाला हादराच बसेल. ई कॉमर्स वेबसाईट ओएलएक्सवर बेबी सेलिंग नावाच्या टॅगने एक लाख रुपयांत दहा दिवसांचं नवजात बाळ विकण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. या जाहिरातीत फोन नंबरसोबत मुलाचा फोटोही दिला आहे. बारीडीहच्या वास्तु विहारचे रहिवाशी कांती पटेल यांनी नेट सर्फिंग करताना ही जाहिरात पाहिली. यानंतर त्यांनी सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

ओएलएक्स पर बिक रहा नवजात, वजह जानकर रह जाएंगे हैरान Jamshedpur News

जाहिरात देणारा व्यक्ती म्हणाला, ‘अजित राज बोलतोय’

कांती पटेल यांनी जाहिरात पाहिल्यानंतर दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. समोरच्या युवकाने त्याचे नाव अजित राज सांगितले. त्याने उलीडीहच्या शंकोसाई मध्ये रहात असल्याचे सांगितले. त्यानेच ही जाहिरात दिली आहे असेही तो म्हणाला. त्याला एका लाखात बाळ विकायचे आहे. अजित सोबत बोलणं झाल्यानंतर कांती पटेल यांनी सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. जेव्हा कांती पटेल यांनी हे बाळ कोणाचं आहे याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने उत्तर दिले की, हे बाळ आईचं आहे. त्याला बाळ विकायचं आहे.

कांती पटेल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत शहरात मुलांच्या चोरीची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे  पोलिसांनी याबाबत माहिती दिली. ओएलएक्सवर मोबाईल सर्च करताना त्यांना अचानक ही जाहिरात दिसली. अजित राज असे जाहिरात देणाऱ्याचे नाव होते.

‘आजारी असल्यानं बाळाला विकतोय’

अजितने एका साईटशी बोलताना सांगितले की, हे बाळ 10 दिवसांचं आहे. बाळ विकण्याचं मान्य करत त्याने सांगितलं की, हे बाळ आजारी आहे. त्याला रांचीत दाखवण्यात आलं होतं. त्याला गंभीर आजार आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर 5 लाख मागत आहेत. म्हणून त्याला विकत आहे. जर कोणी त्याला विकत घेतलं आणि त्याच्यावर उपचार केले तर त्याचं आयुष्य वाचू शकतं.

याबाबत बोलताना एसीपी म्हणाले, “सदर प्रकरणी तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फोन नंबर ट्रेस करून आरोपीचा शोध घेतला जात आहे. कायद्यानुसार, त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.”