
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sara Ali Khan – Janhavi Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) रविवारी रात्री एपी ढिल्लॉन (A.P Dhillon) कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत इब्राहिम अली खानही (Ibrahim Khan) उपस्थित होते. या मैफलीत तिघांनी खूप धमाल केली. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कॉन्सर्टमध्ये जान्हवी, सारा (Sara Ali Khan – Janhavi Kapoor) आणि इब्राहिमने एपी ढिल्लॉनच्या गाण्यांवर डान्स केला. विशेष म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम खान ही अभिनेता सैफ अली खानची मुले आहेत. तर अभिनेत्री जान्हवी कपूर ही बोनी कपूर यांची मुलगी आहे.
मात्र, या मैफलीत कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कोविड नियमांचे पालन न केल्याबद्दल आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. खरं तर, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे, मुंबई पोलिसांनी शहरात कोणत्याही मिरवणूक, रॅली आणि मोर्चाला बंदी घातली होती. (Sara Ali Khan – Janhavi Kapoor)
पण, काल रात्री मुंबईतच प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी धिल्लन यांचा कॉन्सर्ट पार पडला.
ज्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते आणि अनेक सेलेब्स देखील या कार्यक्रमात स्पॉट झाले होते. सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.
सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांची चांगली मैत्री आहे. दोघांना अनेकदा अनेक ठिकाणी एकत्र जाताना दिसले आहे.
मंदिर असो की रेस्टॉरंट, जान्हवी आणि सारा अली खान एकत्र फिरताना दिसतात.
Web Title : sara ali khan janhvi kapoor ibrahim take taxi after grooving to ap dhillon s captivating music
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल
LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन
Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’