जन्माष्टमीला 27 वर्षानंतर महासंयोग, ‘या’ 3 Lucky राशींना होणार फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टिम –  जन्माष्टमीचा सण या वर्षी मंगळवार 11 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळी अष्टमी तिथी 11-12 ऑगस्ट अशी दोन दिवस राहील. यामुळे अनेक ठिकाणी बुधवार 12 ऑगस्टला सुद्धा लोक जन्माष्टमी साजरी करतील. जन्माष्टमीचा सण यावर्षी खास आहे, कारण 27 वर्षानंतर एक अतिशय अद्भूत संयोग बनत आहे. 1993 नंतर जन्माष्टमीला पहिल्यांदा बुधाष्टमी आणि सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे. ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुळ, मकर आणि मीन राशींना यामुळे जास्त लाभ होऊ शकतो.

मेष
मेष राशीच्या जातकांची मोठ्या कालावधीपासून अडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमसंबंधातील अडचणी दूर होती. यादिवशी गाईच्या दूधाने श्रीकृष्णाची पूजा करा. पंचामृतातून श्रीकृष्णाची उपासना केल्याने लाभ होईल.

वृषभ
वृषभ राशीच्या जातकांच्या एश्वर्यात वाढ होईल. घरात सुख येईल. कच्च्या लस्सीने बाल गोपाळांचा अभिषेक करा. या राशीच्या जातकांनी श्रीकृष्णाला पांढर्‍या लोण्याचा नैवद्य द्यावा. श्रीकृष्णाला पांढरा रंग खुप प्रिय आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सुद्धा या रंगाने प्रसन्न होतो.

मिथुन
मोठ्या कालावधीपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. मिथुन राशीच्या जातकांनी श्रीकृष्णाला खडीसाखरेचा नैवद्य द्यावा. उसाच्या रसाने सुद्धा तुम्ही प्रभुंचा अभिषेक करू शकता.

कर्क
जीवनात असलेले कठीण प्रसंग दूर होतील. रोगांपासून मुक्ती मिळेल. कर्क राशिच्या जातकांनी दूधात तुळस टाकून भगवान श्रीकृष्णाला नैवद्य अर्पण करावा. कच्च्या दूधाचा श्रीकृष्णाला अभिषेक करावा.

सिंह
लग्नाला होत असलेला विलंब दूर होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. श्रीकृष्णाला झोपाळ्यात झुलवा. केसराच्या बर्फीचा नैवद्य द्या. गुलाबाच्या सरबताने श्रीकृष्णाचा अभिषेक करा.

कन्या
कन्या राशीवाल्यांचा भाग्योदय होईल. व्यवहारात सकारात्मक परिवर्तन येईल. श्रीकृष्णाला लाडूचा नैवद्य अर्पण करा. उसाच्या रसाने देवाचा अभिषेक करा.

तुळ
तुळ राशीवाल्यांच्या पैशांच्या समस्या दूर होती. भगवान कृष्णाला पांढर्‍या लोण्याचा नैवद्य अर्पण करा. कच्च्या लस्सीने अभिषेक करा.

वृश्चिक
तुमची सर्व कामे अतिशीघ्र पूर्ण होतील. शत्रूंचे कट उधळले जातील. वृश्चिक राशीच्या जातकांनी भगवान श्रीकृष्णाला गाईच्या दूधाचा नैवद्य अर्पण करावा. पंचामृताने त्यांना अभिषेक करा.

धनु
धनु राशीच्या जातकांना नातेवाईकांकडून शुभवार्ता समजतील. ओळखीच्या लोकांशी असलेले वाद संपुष्टात येतील. भगवान श्रीकृष्णाला बेसणच्या बर्फीचा नैवद्य अर्पण करा. हळदयुक्त दूधाने बाल गोपाळाला अभिषेक करा.

मकर
मकर राशीवाले अभ्यास चांगला करतील. एकाग्रता वाढेल आणि करियरमध्ये प्रगती होईल. श्रीकृष्णाला झोपाळ्यावर झुलवा. गंगाजलने अभिषेक करा.

कुंभ
कुंभ राशीच्या जातकांच्या तमाम अडचणी दूर होतील. घरात आनंद येईल. घरातील सदस्यांचा भाग्योदय होईल. शुद्ध गावठी तूवाच्या मिठाईचा द्वारकाधीशाल नैवद्य अपर्ण करा. पंचामृताने अभिषेक करा.

मीन
मीन राशीवाल्यांना व्यापारात यश मिळेल. मोठ्या समस्या दूर होतील. बेसनच्या बर्फीचा श्रीकृष्णाला नैवद्य अर्पण करा. केसरयुक्त दूधाने अभिषेक करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like