संजय राऊतांचं ‘जय महाराष्ट्र’ कोणासाठी ? ‘सस्पेन्स’ वाढला !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – दिवसेंदिवस सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स वाढत असताना, महाराष्ट्रात सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या पक्षाने आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन यावे अशी अट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घातली असल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. याबाबत भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, १७० आमदारांचा पाठींबा असलेले पत्र लवकरच राज्यपालांसमोर सादर करू.

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर त्याच्याशी सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचे सांगत शरद पवारांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजून वाढवला आहे. त्यानंतर मात्र दिल्लीत असलेल्या संजय राऊत यांनी ‘ जय महाराष्ट्र ‘ असे म्हणत एक ट्विट केले आहे. तर हे ट्विट नेमकं कशासंदर्भात आणि कोणाला उद्देशून केले आहे याचे उत्तर अद्याप तरी मिळणे कठीण आहे.

नेमकं काय म्हणालेत संजय राऊत ट्विटमध्ये

अगर जिंदगी मी कुछ पाना हे
तो तारिके बदलो इरादे नही
जय महाराष्ट्र

संजय राऊत यांनी या ट्विटद्वारे नेमकं कोणाला जय महाराष्ट्र केलंय हे अद्याप तरी उलगडलेले नाही मात्र या ट्विटमुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अधिक वाढलाय येवढ मात्र नक्की.

याआधी सत्ता स्थापनेसाठी येताना प्रत्येक आमदाराच्या सहीचे प्रमाणपत्र घेऊन यावे तसेच यावर आमदाराने आपण स्वखुशीने स्वाक्षरी केली असल्याचे लिहून द्यावे आणि प्रत्येक पत्र संबंधित पक्षाच्या नेत्याने स्वाक्षांकित करावे अशी अट राज्यपाल कोश्यारी यांनी घातल्याचे समजते.

Visit : Policenama.com