Jayant Patil on Devendra Fadnavis | ‘बाबरी पतनावेळी फडणवीस 13 वर्षांचे होते, मग अडवाणींवरही…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil on Devendra Fadnavis | बाबरी मशिद (Babri Masjid) पाडली तेव्हा आपण तिथे असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला. मात्र त्यावेळी तिथे एकही शिवसैनिक नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना धारेवर धरलं असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका केली आहे.

 

1992 साली देवेंद्र फडणवीस अवघ्या 13 वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस अयोध्येला (Ayodhya) गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. यामुळे लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्यावर 13 वर्षांच्या बालकाला अयोध्येला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट आहे, मात्र त्यांनी मला कधी बाबरी पाडायला गेले असल्याचं सांगितलं नाही. मी भेटल्यावर त्यांच्याकडून याबाबतची सर्व माहिती घेईल. मीसुद्धा त्यांना खाजगीमध्ये विचारणार आहे. बाबरी मशिद पाडल्यावर बाळासाहेबांनी जशी जबाबदारी स्वीकारली होती तशी जबाबदारी फडणवीस घेणार आहेत का ?, असा सवालही पाटलांनी फडणवीसांना केला आहे.

 

दरम्यान, देशामध्ये महागाईमुळे (Inflation) मोदी सरकारला अपयश जाणवत आहे.
यामध्ये गोर – गरिब आणि सामान्य जनता होरपळून निघत आहे. मात्र यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजप (BJP) धर्म ही अफूची गोळी वापरत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

 

Web Title :- Jayant Patil on Devendra Fadnavis | ncp leader jayant patil taunts bjp leader devendra fadnavis over babri demolition

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा