Jayant Patil On Shinde-Fadnavis-Pawar Govt | मंत्र्यांसाठी 1500 रु.ची शाही थाळी ! शेतकऱ्याच्या खात्यात 252 रु. अनुदान, मंत्रिमंडळाच्या ‘राजेशाही’ बैठकीवरून जयंत पाटील संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Shinde-Fadnavis-Pawar Govt | संभाजीनगरमध्ये शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत असून या बैठकीसाठी जनतेचे कोट्यवधी रूपये खर्च करून राजेशाही थाट केला जात आहे. तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शे-दोनशे रूपयांचे अनुदान खात्यात पाठवून त्यांची क्रूर चेष्टा राज्य सरकारने चालवली आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत मंत्र्यांच्या राजेशाही थाटातील बैठकीवर सडकून टीका केली. (Jayant Patil On Shinde-Fadnavis-Pawar Govt)

शनिवारी संभाजी नगरमध्ये होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शासकीय यंत्रणेची प्रचंड धावपळ सुरू आहे. मंत्र्यांसाठी शासकीय विश्रामगृहासह, हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या आरक्षित केल्या आहेत. दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी, विद्युत रोषणाईचा झगमगाट केला आहे. सुमारे ३०० वाहनांचा ताफा, असा शाहीथाट कोट्यवधी रूपये खर्च करून मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी करण्यात आला आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या दिमतीला सुमारे ४०० अधिकारी आहेत. (Jayant Patil On Shinde-Fadnavis-Pawar Govt)

या बैठकीच्या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू आहेत. काही मंत्री आजपासूनच शहरात दाखल होत आहे. तर काही मंत्री शनिवारी सकाळी दाखल होतील. यावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

जयंत पाटील यांनी म्हटले की, फेब्रुवारी-मार्च महिन्यात अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचवाड येथील शेतकऱ्याने ११२ क्विंटल ९० किलो लाल कांदा विकला त्यानुसार ३९ हजार अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त २५२ रुपये टाकण्यात आले.

एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा,
दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट… आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक
शेतकऱ्याला अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत सरकारने क्रूर थट्टा चालवली आहे.
लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांना जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा, असे म्हणत पाटील यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना