Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar | पुतण्यावर काका भारी ! बीड तालुका दुध संघावर जयदत्त क्षीरसागरांची बाजी; आमदार संदीप क्षीरसारग यांचं प्लॅनिंग बारगळलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar | बीड जिल्ह्यात (Beed News) एक वेगळंच राजकारण पाहायला मिळतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्या अनेक वेळा आमने-सामने आल्याचे दिसले. अशातच आता बीड जिल्ह्यातील तालुका दुध संघाच्या निवडणुकीमध्ये (Beed Taluka Dudh Sangh Election) विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (NCP MLA Sandeep Kshirsagar) यांच्या पक्षाला उमेदवारही उभे करता आले नाहीत. त्यामुळे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी एकहाती बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. आणि पुन्हा एकदा आपला गड राखला आहे. (Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar)

बीडच्या सहकार क्षेत्रातील तालुका दुधसंघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि त्यात काकाने बाजी मारल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये काका-पुतण्या भारी ठरणार का? हे बघावं लागणार आहे. दरम्यान, सध्याच्या दुध संघाच्या सत्तेमुळे ग्रामीण भागातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची ताकद वाढली असल्याचे दिसत आहे. (Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar)

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘दूध संघाच्या स्थापनेपासून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवलाय, दुधावर प्रक्रिया करत ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचा फायदा होईल, या अनुषंगाने काम करत आहोत,’ असं ते म्हणाले.

Web Title :- Jaydatta Kshirsagar MLA Sandip Kshirsagar | ex minister jaydatta kshirsagar won beed taluka dudh sangh election against NCP MLA sandip kshirsagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

Jalna Crime | मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या खूनाची सुपारी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले