भीषण अपघात ! पुलावरून जीप नदीत कोसळली, ६ जण जागीच ठार

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव काळी पिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून ६ जण जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावाजवळ घटली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघातातील मृतांमध्ये ५ मुली आणि एका महिलेचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तर इतर ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून लाखादूर येथे काळी पिवळी जीप जात होती. त्यावेळी धर्मापुरी गावाजवळ असलेल्या पुलावरून जात असताना खासगी वाहतुक करणाऱ्या काळी पिवळीवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही जीप थेट पुलावरून ८० फुट खोल नदीच्या पात्रात कोसळली.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत ५ मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

You might also like