उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने जेजुरीत ‘आनंदी थाळी’

जेजुरी (संदीप झगडे) : कोरोना विषाणूच्या संकटात पुरंदर हवेलीतील गरजू लोकांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी पुरंदर हवेलीमध्ये मोफत आंनदी थाळी ही योजना सुरु असून या योजनेला प्रतिसाद देत जेजुरी येथील उघडा मारुती मित्र मंडळाने आनंदी थाळी या उपक्रमास अक्षय तृतीयाच्या शुभ मूहर्तावर सुरुवात केली.

उघडा मारुती मंडळाच्या वतीने गेली एक महिना अनाथ,बेघर,अपंग,मजूर तसेच जेजुरी शहरातील गरीब व गरजू अशा ८०० व्यक्तींना दररोज दोन वेळचे जेवण दिले जाते. अक्षय तृतीया निमित्त आमरस पुरीचे रात्रीचे जेवण जयमल्हार केटरचे मोहन महाराज खोमणे यांनी दिले.तर उघडा मारुती मंडळाच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून आनंदी थाळी सुरु करण्यात आली आहे . या विषाणूचे संकट लक्षात घेऊन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप तसेच ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिणी जगताप यांनी पुरंदर व हवेली तालुक्यात मोफत आनंदी थाळी हा उपक्रम सुरू केला आहे.या आनंदी थाळीच्या वतीने पुरंदर हवेली तालुक्यातील दहा हजाराहुन अधिक लोकांना दोन वेळचे जेवण घरपोच दिले जाते.

जेजुरीमध्ये उघडा मारुती तरुण मंडळाच्या वतीने आनंदी थाळीच्या माध्यमातून दररोज 800 लोकांचे जेवण लवथळेश्वर येथे मंडळाचे कार्यकर्ते दादा मुलाणी यांच्या वर्क शॉप मध्ये २० ते २५ स्वंयसेवकांच्या माध्यमातून बनविले जात आहे . या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक सचिन सोनवणे,अनिल पोकळे, दादा मुलाणी,उमेश गायकवाड, बाळासाहेब माळवदकर,अशोक भोसले,मारुती सातभाई,सादिक बागवान,संजय रणखांबे,संतोष वायकर,अजित भोंगळे,शब्बीर शेख,महेश गायकवाड,प्रशांत वासकर,नितिन खेडेकर , गौरव लांघी, महेश देशपांडे,उत्तम यादव असे अनेक स्वंयसेवक रात्रंदिवस झटत आहेत.