जेजुरीच्या खंडोबाला सफरचंदाची महापूजा व फुलांची सजावट

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी च्या खंडोबा देवास पुणे येथील खंडोबा देवाचे भक्त झेंडे परिवाराने एकशे एक किलो सफरचंद अर्पण करून सफरचंद व फुलांची आकर्षक सजावट केली . सद्या संपूर्ण देशात लॉकडाऊन मुळे तीर्थक्षेत्र, मंदिरे बंद करण्यात आली आहेत.जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थान हे शासनाचे नियमांचे काटेकोरपने पालन करीत असून केवळ त्रिकाल पूजा गडावर सुरु आहेत . सोशल डीस्टिंगशन चा वापर आणि मोजक्या पुजारी सेवक व नित्य वारकरी यांच्या माध्यमातून पूजा केली जाते .

आजच्या पूजेवेळी देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे ,श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे ,सचिन उपाध्य ,शशिकांत सेवेकरी गुरुजी चेतन सातभाई , सोमनाथ उबाळे ,जालिंदर खोमणे विजय खोमणे, प्रकाश भापकर उपस्थित होते यावेळी खंडोबा भक्त झेंडे या परिवाराने पाठवून दिलेल्या सफरचंद फळांची महापूजा घालण्यात आली तर विविध प्रकारच्या फुलांनी गाभाऱ्याची सजावट करण्यात आली होती .