काय सांगता ! होय, 20 वर्षांपूर्वी पळून गेलेल्याची ‘कोरोना’च्या भीतीमुळे ‘घरवापसी’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेकांना सुख दुःखाला सामोरे जावे लागले आहे. झारखंडमधील धनबाद येथील कुटुंबासाठी कोरोनाची साथ आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कौटुंबिक वादामुळे 20 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेली एक व्यक्ती साथीमुळे पुन्हा घरी आली आहे. सत्य नारायण यादव असे त्याचे नाव आहे.

कौटुंबिक वादानंतर रागाच्याभरात सत्य नारायण याने सन 2000 साली घरातून पळ काढला. तो दुसर्‍या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होता. मात्र सत्य नारायण नक्की कुठे आहे याबद्दल कुटुंबातील कोणाला काहीच माहिती नव्हती. सत्य नारायण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती मात्र सत्य नारायण यांचा पत्ता लागला नव्हता, मात्र, कोरोनाच्या साथीमुळे तब्बल 20 वर्षानंतर सत्य नारायण घरी परतल्याने कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. घरातून पळून गेल्यानंतर त्यांनी पैसे कमवण्यासाठी वजन करण्याचे मशीन विकत घेऊन रस्त्याच्याकडेला बसू लागले. येणार्‍या जाणार्‍यांपैकी कोणी वजन केले तर सत्य नारायण यांना दिवसाला काही रुपये मिळत होते. मात्र मागील आठवड्यामध्ये त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.