Jio चा धमाकेदार प्लॅन आजपासुन सुरू ! फक्त ‘एवढ्या’ रूपयांच्या रिचार्जवर संपूर्ण वर्षभर अनलिमिडेट सुविधा, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाचे औचित्त साधून रिलायन्स जिओने 2020 या नवीन वर्षासाठी नवीन धमाकेदार प्लॅन आणला आहे यानुसार एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्ही वर्षभर अनलिमिटेड सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता. जिओने सांगितले की, जिओची ‘2020 हॅपी न्यू इयर ऑफर ‘मर्यादित काळासाठी आहे. ही ऑफर आजपासून अर्थात 24 डिसेंबरपासून सुरू होईल.

नेमकी काय आहे ही ऑफर
जिओच्या ‘2020 हॅपी न्यू इयर ऑफर’ मध्ये 2020 रुपयांचे रिचार्ज केल्यावर युजरला एका वर्षासाठी अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. युजरला एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1.5 जीबी 4G डेटा, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सवर विनामूल्य एक्सेस मिळणार आहे. या ऑफरची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.

जियोफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी रिलायंसने ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2020 रुपयांच्या पेमेंटवर नवीन जिओफोन देखील मिळणार आहे, एवढेच नाही तर युजर्सला 12 महिन्यांच्या अनलिमिटेड सेवाही देण्यात येणार आहे.

या ऑफरअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 0.5 जीबी डेटा, एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरची वैधता 12 महिन्यांसाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी असणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/