Jio चे भन्नाट प्लॅन, बंपर डेटा आणि अनलिमिटेड कॉल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना रिलायन्स जिओने जून महिन्यात ४ जी स्पीडबाबत मागे टाकलं आहे. देशाची टॉप ४ जी इंटरनेट स्पीड असलेल्या जिओ कडे अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहे. तर आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या ३३६ दिवसांची वैधता असणाऱ्या प्लॅन बाबत माहिती सांगणार आहोत. जिओचे हे प्लॅन्स २१२१ रुपये आणि १२९९ रुपये किंमतीचे असून याची वैधता ३३६ दिवसांची आहे.

जीओचा १२९९ रुपयांचा प्लॅन
१२९९ रुपयांच्या जिओच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तसेच नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट प्राप्त होतात. या पॅकमध्ये एकूण २४ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps च्या स्पीडने डेटा मिळतो. तसेच ग्राहकांना ३६०० फ्री एसएमएसचा फायदा दिला जातो. जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये फ्री दिलं जात.

२१२१ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. यात दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. एकूण ५०४ जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps स्पीड मिळते. या पॅकमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट मिळतात. ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री मिळतात. तसेच रिलायन्स जिओच्या प्रत्येक प्लॅनप्रमाणे जिओ अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.