दीपिका ‘तुकडे-तुकडे’ गँगची समर्थक, तिच्या सिनेमांवर ‘बहिष्कार’ टाका, भाजपाच्या नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली.

त्यानंतर भाजपकडून तिच्यावर टीका करण्यात आली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. मात्र दीपिकानं माध्यमांशी बोलणं टाळलं. पावणे आठ वाजता जेएनयूच्या परिसरात पोहोचलेली दीपिका जवळपास १० मिनिटं आंदोलनस्थळी उपस्थित होती. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार ‘जय भीम’च्या घोषणा देत होते. दीपिकानं जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

रविवारी झालेल्या हिंसाचारात आइशी घोष जखमी झाली. तिच्या डोक्याला जखम झाली. त्यातून बराच रक्तस्रावदेखील झाला. घोषसोबतच साकेत मून, सतीश यादव, सारिका चौधरी आणि इतरांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व्हर रुममध्ये तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देशविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी जेएनयूमध्ये तोडफोड केल्याचं म्हणत त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र अद्याप तोमर किंवा त्यांच्या संघटनेतील कोणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/