सरकारी नोकरी ! NIC कडून 495 जागांवर भरती सुरु, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातअतंर्गत नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) ने ग्रुप बी मध्ये सायटिस्ट आणि सायटिस्ट / टेक्निकल असिस्टेंट पदांच्या एकूण 495 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी recruitment.nic.in या वेबसाइटवर 26 मार्च 2020 ला 5 वाजेपर्यंत अर्ज करता येतील.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे 23 फेब्रुवारी 2020 ला आपल्या वेबसाइटवर जाहिरात दिली होती त्यानंतर 26 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होईल. यासाठी लेखी परिक्षेच्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येईल.

पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता –
1. सायटिस्ट बी (ग्रुप बी) – 288 पद – संबंधित ट्रेंडमधून बीई/ बी टेक डिग्री किंवा डोएक बी लेवल किंवा एएमआय, जीआयआयटीईआय किंवा एमएमससी किंवा एमसीए किंवा एमई, एमटेक किंवा एमफिल ड्रिगी पूर्ण केलेली असावी.

2. सायटिफिक / टेक्निकल असिस्टंट ए (ग्रुप बी) – 207 पद – संबंधित ट्रेडमधून बीई/ बी टेक डिग्री किंवा एमएससी किंवा एमसीए किंवा एमएस उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 मार्च 2020 रोजी 30 पेक्षा जास्त नसावे. आरक्षण मिळणाऱ्यांसाठी उमेदवारांसाठी अधिकतम वयाची सीमेत सरकाराने दिलेल्या नियमानुसार सूट मिळेल.

शुल्क –
उमेदवारांना या पदासाठी अर्ज केल्यानंतर परिक्षा शुल्क म्हणून 800 रुपये भरावे लागतील. तसेच एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज –
उमेदवार recruitment.nic.in या वेबसाइटवर जाऊन 26 मार्च 2020 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपूर्वी अर्ज करुन शकतात. अर्जदारांनी नोटीफिकेशन, ऑनलाइन अर्ज आणि संबंधित दिशा निर्देशाची व्यवस्थित वाचन करावे. त्यानंतर अर्ज करावा.