अखेर मंत्रिपदाबाबत प्रणिती शिंदे बोलल्या, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी काही अनुभवी तर काही युवा चेहऱ्यांना मंत्री पदाच्या खुर्चीत बसवले आहे. मात्र अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना यावेळी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या देखील नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने खंत वाटत नसल्याचे मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात महाविकास आघाडी स्थापनेमागे मुख्य उद्देश भाजपला दूर ठेवण्याचा प्रयोग आहे. जातीवादी शक्तींना बाजुला ठेवण्यासाठीच हे सरकार असल्याचे प्रणिती यांनी सांगितले. तसेच नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत प्रणिती बोलत होत्या.

मला मंत्रिपद मिळाले नसले तरी पक्षाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य आहे कारण पक्षाने आणि पक्ष श्रेष्ठींनी आपल्याला कायम न्याय दिला असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपदाची मोठे आव्हान आहे मात्र आपण लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/