Video : अगोदर देशात इंग्रज होते आता ‘हे’ अतिरेकी ; ‘त्यांना’ थांबवण्यासाठीच मोदींनी मला उमेदवारी दिली

कांचन कुल यांची पवार, खा. सुप्रिया सुळेंवर खरमरीत टीका

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – बारामती लोकसभेचा प्रचार आता आरोप प्रत्यारोपांनी चांगलाच गाजताना दिसत आहे. काल सुप्रिया सुळेंनी मोदी आणि मुख्यमंत्र्यांना गोध्रा-बिद्रा सब उधर, इधर ये सब होणे नही दूगी असा इशारा दौंडमधून दिला होता. आज त्यांना प्रत्युत्तर देताना कांचन कुल यांनी दौंडमधील एका सभेत बोलताना आधी आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, आता हे अतिरेकी आहेत असे संबोधून मोदी साहेबांनी काहीतरी विचार करूनच हि उमेदवारी आम्हाला दिली आहे, असा पलटवार केला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, बारामतीत आपण म्हणतो विकास झाला पण बारामतीच्या दोन किलोमीटर अंतरावर प्यायला पाणी नाही हि वस्तुस्थिती आहे. निवडणुकीवेळी मतदान करा नाहीतर पाणी बंद करू असा दम यांच्याकडून दिला जातो असे कांचन कुल म्हणाल्या. ही लोकसभा निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भाजपकडून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत असून स्थानिक पक्षप्रमुखांवर उमेदवारांना निवडणुकीत लीड देण्याची मोठी जबाबदारी दिली गेेली आहे.