कंगना ड्रग घेण्याचा तपास करणार महाराष्ट्र सरकार, अध्ययन सुमनच्या मुलाखत बनला आधार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारशी पंगा घेणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या ड्रग कनेक्शनची चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, अध्यायन सुमनच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे ही चौकशी केली जात आहे.

शिवसेना नेते सुनील प्रभू आणि प्रताप यांनी अध्यायन सुमनच्या जुन्या मुलाखतीची एक कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली आहे. अध्यायन सुमनने आरोप केला होता की, कंगना ड्रग घेते आणि तिलाही ड्रग्ज घेण्यास भाग पाडले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस चौकशी करतील.

कालच महाराष्ट्र कॉंग्रेसने कंगना रनौतशीही संबंधित असलेल्या ड्रग संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली होती. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते की, काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात कंगनाने कबूल केले आहे की ती ड्रग्ज घेते. जर तसे असेल तर मग तिला कोण ड्रग्जचा पुरवठा करत होते. एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि त्यांनी कंगनाशी संबंधित प्रकरणाचीही चौकशी केली पाहिजे.

सचिन सावंत म्हणाले होते की, कंगनाच्या माजी सहकाऱ्यांनी खुलासा केला आहे कि ती कोकेन इत्यादी पदार्थांचे सेवन करायची आणि तसे आहे तर एनसीबीने या प्रकरणाची दखल घेऊन कंगनाची चौकशी केली पाहिजे.

विशेष म्हणजे की, कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक लढाई सुरू आहे. या दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. यावर संजय राऊत यांनी मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यानंतर कंगनाने ९ सप्टेंबरला ती मुंबईत येण्याची घोषणा केली होती. कालच कंगनाला ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे.