जया बच्चन यांच्यावर कंगनाचा हल्ला, म्हणाली – ‘कौन सी थाली दी है जया जी और उनकी इंडस्ट्री ने ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  रवि किशन आणि जया बच्चन यांच्यात सुरू झालेल्या ड्रग वॉरमध्ये आता अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील उडी घेतली आहे. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर खिल्ली उडविताना तिने त्यांच्यावर अनेक प्रश्न डागले आहेत. कारण जया बच्चन यांनी रवी किशन यांच्यावर ‘जिस थाली में खाया उसी में छेद किया’ असे आरोप लावले होते, त्याच कंगना राणौतने त्याच आरोपात जया बच्चन यांना आरसा दाखविला आहे.

कंगनाने ट्विटद्वारे जया यांना सांगितले की, ‘या इंडस्ट्रीत दोन प्रकारच्या थाळी पहायला मिळतात. एका थाळीमध्ये फक्त अभिनेत्रीला आयटम नंबर मिळतो, तर दुसरी थाळी अशी आहे जिथे नारीप्रधान आणि देश प्रेम असे चित्रपट बनले आहेत. ती लिहिते – जया जी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे? एक थाळी मिळाली ज्यामध्ये दोन मिनिटे रोल आयटम नंबर आणि एक रोमँटिक सीन मिळत होता, तो देखील हिरो सोबत झोपल्यानंतर. मी इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकविले, थाळी देशभक्ती नारिप्रधान चित्रपटांनी सजविली, ही माझी स्वतःची थाळी आहे जया जी तुमची नाही.

 

 

कंगनाचा जयावर साधला निशाणा

आता कंगनाच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे . तिने पुन्हा एकदा या गोष्टीकडे दिला की, बर्‍याच वेळा चित्रपटात काम करण्यासाठी अनेक अभिनेत्रीना कलाकारांसोबत झोपावे लागते. आता अभिनेत्रीच्या या विधानावर बॉलिवूडची प्रतिक्रिया काय आहे हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. तसे, याआधीही कंगनाने जया बच्चन यांच्या विधानावर निशाणा साधला होता. त्यांनी अभिषेक बच्चन यांना वादात ओढले होते आणि म्हणाले- जया जी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला किशोरवयात मारहाण केली गेली असती, ड्रग्स दिल गेल असत आणि विनयभंग केला तर तुम्ही असेच म्हटला असता का? अभिषेकसोबत सतत गुंडगिरी व छळवणूक केली जात असती आणि एक दिवस त्याने स्वत: ला लटकवले असते तरीही तूम्ही असेच म्हटला असता? आमच्यासाठीही हात जोडून करूणा दाखवा.

त्याचबरोबर रवि किशनसुद्धा आपल्या विधानावर ठाम असून ते सतत जया बच्चन यांना सफाई देत आहे. त्यांच्या मते, कोणत्याही थाळीमध्ये विष असेल तर त्यामध्ये छिद्र केले जाईल. ते बॉलिवूडमधून ड्रग्स संपविण्यायी बोलत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like