8 पोलिसांचा ‘मारेकरी’ विकास दुबेचं एन्काउंटर खरं की खोटं ? प्रदीप शर्मांनी सांगितलं अनुभवानुसार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा एन्काउंटर केला आहे. ज्याप्रकारे पोलिसांनी विकास दुबेचा एन्काउंटर केलं आहे, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थितीत होताहेत परंतु, मुंबई पोलिसमध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केलंय.

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेचे एन्काउंटर होणे हि बाब साहजिकच आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे. ‘जेव्हा एखाद्या आरोपीचे एन्काउंटर होतो. तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होतात. पण, या कुख्यात गुंडाने 8 पोलिसांची हत्या केली तेव्हा कुणी मानवधिकार आयोगाकडे जात नाही. अशा आरोपींसोबत जे घडल ते बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

‘विकास दुबेचं एन्काउंटर हे मुळीच खोटे एन्काउंटर नाही. ज्या चारचाकीत विकास दुबे होता, त्या वाहनाचा ड्रायव्हर हा उज्जैनपासून वाहन चालवत होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ड्रायव्हर हा तणाव आला असेल, त्यामुळे वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल म्हणून त्यात तो मारला गेला.’, असेही प्रदीप शर्मा यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, प्रदीप शर्मा यांनी मुंबईत अनेक कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक गुंडांचं एन्काउंटर केले आहे. शर्मा यांची ‘चकमकफेक’ अधिकारी अशी ओळख होती. सन 1983 मध्ये प्रदीप शर्मा हे पोलीस दलात दाखल झाले होते. शर्मांनी आत्तापर्यंत 100 हून अधिक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहेत. गुंड विनोद मटकरचे केलेले एन्काऊंटर गाजले होते. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही शर्मांनी एन्काउंटर केला होता. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटर केला होता.

मात्र, 2008 मध्ये शर्मा यांना लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना पोलीस दलातून निलंबीत केले होते. 2013 मध्ये मुंबई हायकोर्टाने शर्मा यांची मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक आरोपांमधूनही शर्मा यांची मुक्तता केली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूकही लढवली. पण, यात त्यांना यश मिळाले नाही.

मध्य प्रदेशातील उज्जैनी इथे गुरुवारी सकाळी महाकाली मंदिरातून आरोपी विकास दुबे याला पकडले होते. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी केली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैनी येथून कानपूरच्या दिशेने नेण्यात येत होते.

शुक्रवारी सकाळी 6.15च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. यात वाहन उलटले. यात विकास दुबे मध्यभागी बसला होता. त्याने बाजूच्या पोलिसाची बंदूक हिसकवून जखमी असतानाही पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या दुर्घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी उलटलेल्या वाहनातील विकास दुबेला पाहिलं, मात्र त्याने तिथून पळ काढत होता. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान विकास दुबे एका ठिकाणी लपून बसल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी त्याला सरेंडर होण्याचे आदेश दिले. मात्र, विकासने पोलिसांवर गोळीबार केला.यातच तो मारला गेला.

सुरुवातील पोलिसांनी विकासला समजावले. मात्र, तो काही ऐकत नव्हता. यावेळी पोलिसांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळीबार केला. काही वेळानंतर दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. त्यातील एका पोलिसाची गोळी विकासला लागली. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये दुबेला ठार केले. त्यानंतर विकास दुबेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी विकासला मृत घोषित केले होते. कानपूरमधील 8 पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.