कपिल देव यांचा नवा लुक ‘व्हायरल’ ! विवियन रिचर्ड्सच्या बायोपिकमध्ये करणार काम ?

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या लॉकडाऊनमध्ये सलून बंद असल्यानं केस आणि दाढी वाढलेले अनेक क्रिकेटर्सचे लुक समोर आले होते. ज्यांनी घरीच आपले केस कापले. त्यांचे फोटोही व्हायरल होताना दिसले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांचा समावेश आहे. परंतु या सगळ्यावर भारी पडला तो म्हणजे कपिल देव यांचा लुक. कपिल देव यांनी डोक्यावरचे सर्व केस काढले आहेत. परंतु दाढी मात्र आहे तशीच आहे. हेच कारण आहे की, त्यांचा लुक एकदम वेगळाच आणि नवीन वाटत आहे.


कपिल देव यांचा हा लुक समोर आल्यानंतर सोशलवर लगेच व्हायरल तर झालाच सोबत अनेक चाहत्यांकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसल्या. अनेकांनी तर त्यांना प्रश्नच विचारले आहेत. एकानं विचारलं की, तुम्ही विवियन रिचर्ड्स यांच्या बायोपिकमध्ये काम करत आहेत का. एकजण असंही म्हणाला की, 83 मध्ये कपिल देव सैयद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या एका फॅन फेजनंतर त्यांना खूपच फनी कमेंट दिली. फॅन पेजनं म्हटलं की, कपिल देव थानोस सारखे दिसत आहे.

सध्या कपिल देव यांचा हा लुक सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अजूनही अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.