Kapil Sharma | कपिल शर्माने दारुच्या नशेत केले असे काही कृत्य ज्यामुळे त्याला सोडावा लागला होता देश; पंतप्रधानांना बोलणे पडले महागात

पोलीसनाम ऑनलाइन – सर्वांना पोट धरुन हसायला लावणारा लोकप्रिय विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) याची लोकप्रियता अफाट आहे. छोट्या पडद्यावरील कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मधून सर्वांचे मनोरंजन करणारा कपिल सिनेविश्वातील एक प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. त्याच्या शोमध्ये जाण्यासाठी अनेक सितारे हे उत्साहित असतात. मात्र सर्वांना हसवणाऱ्या कपिल शर्मावर (Comedian Kapil Sharma) एकदा त्याच्याच कृत्यामुळे रडण्याची पाळी आली होते. त्यामुळे अगदी त्याला काही काळासाठी देश सोडून जावे लागले होते.

प्रसिद्ध व लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा हा त्यांच्या परफेक्ट टाईमिंगवरील जोकमुळे प्रेक्षकांना खूप आवडतो. मात्र एकदा कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये गेला होता. यामधून बाहेर येण्यासाठी त्याने 8 दारुचे पेग रिचवले पण, त्यानंतर नशेमध्ये त्याने केलेल्या ट्वीटमुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आणि कपिलला याची मोठी किंमत देखील मोजावी लागली. 2016 साली घडलेल्या या प्रसंगामुळे कपिल शर्माला खूप ट्रोल (Kapil Sharma Troll) करण्यात आले.

याबाबत कपिलने एकदा सांगितले की ती वेळ त्यांच्यासाठी चांगली नव्हती. तो दिवसेंदिवस डिप्रेशनमधून जात होता. ही गोष्ट त्याने मित्रांसोबत शेअर केली व मित्रांनी नैराश्यातून मुक्त होण्यासाठी त्याला दोन-चार पेग मारण्याचा सल्ला दिला. कपिल म्हणाला की, त्या दिवशी सकाळपासून माझा मूड खराब होता आणि मग मी दोन पेग लावले आणि माझ्या उणीवा मोजू लागलो. त्यानंतर मी चार पेग लावले आणि माझ्या कुक असलेल्या व्यक्तीमधील चूका शोधू लागलो. यानंतर 6 पेग झाले आणि मग मी माझ्या आजूबाजूच्या समाजातील उणीवा मोजू लागलो. आणि मी 8 पेग मारल्यानंतर ही सगळी माझी वाट लागली. 8 व्या पेगनंतर मी देशातील समस्यांवर लक्ष देऊ लागलो. त्यानंतर जे झालं ते साऱ्या जगाने पाहिले आहेच.

कपिलने पुढे घ़डलेला हा प्रसंग सांगितला. की, मी नाव घेणार नाही पण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मी त्याच्यासाठी ट्विट केले आणि एक नाही तर दोन ट्विट केले. 9 सप्टेंबर 2016 रोजी पीएम मोदींना केलेल्या ट्विटमध्ये कपिलने अच्छे दिनवर प्रश्न उपस्थित केला होता. (Kapil Sharma Controversy On Narendra Modi) कपिलने लिहिले, “मी गेल्या पाच वर्षांपासून 15 कोटी रुपयांचा आयकर भरत आहे, परंतु तरीही मला माझे कार्यालय बांधण्यासाठी बीएमसीला (BMC) 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागली आहे. हेच तुमचे अच्छे दिन आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?” कपिलच्या या ट्विटनंतर तो नशेमध्ये झोपून गेला. (Kapil Sharma Tweet Case) सकाळी उठून पाहतो तर सगळी मीडिया गोळा झाली होती. त्याच्या घराखाली प्रचंड गर्दी झाली होती. त्याने पड्दे सरकून पाहिले तर खाली लाईनमध्ये सगळ्या ओबी व्हॅन लागल्या होत्या. कपिलने त्यांच्या कुकला या प्रकाराबद्दल विचारले तर त्याने सांगितले की सगळा गोंधळ तुमच्या ट्विटमुळे झाला आहे. कपिलने सांगितले की, मी माझ्या कुकला सांगितले की त्याने मला का थांबवले, तर तो म्हणाला की तो स्वतः रिट्विट करून बसला आहे.

2016 साली घडलेल्या या प्रसंगामुळे विनोदवीर कपिल शर्माच्या (Comedian Kapil Sharma) अडचणीमध्ये फार वाढ झाली होती. त्याच्या ट्वीटनंतर त्याला लोकांनी खूप सुनावले होते. व नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. याप्रसंगामुळे त्याला देश सोडून काही दिवस मालदीव्सला (Maldives) हॉटेल बुक करुन रहावे लगाले होते. हे प्रकरण निवळे पर्यंत त्यांचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

Web Title : Kapil Sharma | comedian actor kapil sharma tweeted to prime minister narendra modi after drinking 8 pegs till date he pays a heavy price

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा