अटकेत असलेल्या करण ओबेरॉयचा पूजा बेदीला पुळका म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता करण ओबेरॉयला सध्या बलात्कार व ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या केस प्रकरणी त्याला अंधेरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी करण ओबेरॉय रडला. सध्या बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र अभिनेत्री पूजा बेदी हिने करणची पाठराखण केली आहे. करण असे काहीच करूच शकत नाही असा दावा पूजा बेदीने केला आहे.

काय म्हणाली पूजा बेदी

या प्रकरणाबाबत बोलताना पूजा बेदी म्हणाली , ‘करणला मी चांगले ओळखते. तो अतिशय सज्जन, शालीन आणि दयाळू मुलगा आहे. तो असे काही करूच शकत नाही. त्यामुळे करणला नाही तर आरोप करणाऱ्या या महिलेला प्रश्न विचारायला हवेत. कारण तिचे आरोप पुर्णपणे अस्पष्ट आहेत, असे पूजा बेदी म्हणाली.अनेक महिला आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत, पुरुषांवर खोटे आरोप लावतात. एखादी महिला पुरूषांवर खोटे आरोप लावत असेल तर तिला शिक्षा देण्यासाठी काय करता येईल? असा सवालही तिने केला.

काय आहे प्रकरण ?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता करणने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा अश्लील व्हिडीओ तयार केली. या व्हिडीओवरून करण ओबेरॉय वारंवार तिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी करीत होता. असे आरोप करण वर ठवेण्यात आले आहेत. करणला ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहे करण ओबेरॉय ?

करण ओबेरॉय हा ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहोचला होता. ‘‘इन्साइड एज’, ‘साया’ मध्ये देखील त्याने काम केले आहे. तसेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मोना सिंह हिंचा तो माजी प्रियकर आहे. याबरोबरच बाईक्स तसेच काही कपड्यांच्या जाहिरातींमधून देखील तो झळकला आहे. २००१ मध्ये स्थापन झालेल्या ‘ बँड ऑफ बोईज ‘ चा देखील तो सदस्य होता.