40 एकरमध्ये विवाह ‘समारंभ’, 500 पंडितांकडून मंत्रांचं ‘पठण’, पाहिलंत का असं ‘लग्न’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हल्ली थाटामाटात, दिमाखात लग्न सोहळा करण्याचे फॅड सर्वत्र आले आहे. आता कर्नाटकात एक असे शाही लग्न होत आहे. जसे की आपण केवळ चित्रपटांमध्येच पहिले असेल. कर्नाटकातील भाजपचे मोठे नेते श्रीरामुलु आपल्या मुलीच्या लग्नाकरिता तब्बल 100-200 नाही तर 500 करोड रुपये खर्च करीत आहेत. हे लग्न म्हणजे सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि भाजपचे संकटमोचक मानले जाणारे बी. श्रीरामुलु आपली मुलगी रक्षिताच्या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहेत आणि हा विवाह सोहळा देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या विवाहांपैकी एक मानला जात आहे.

500 पंडित पार पाडणार विवाह सोहळा

5 मार्च रोजी रिक्षिताचे लग्न होणार आहे. 9 दिवसाच्या या लग्नाचा उत्सव 27 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. याकरिता एक किंवा दोन पंडित नव्हे, तर तब्बल 500 पंडित हे शाही लग्न पूर्ण करतील, यावरून तुम्ही रिक्षिताच्या लग्नाची भव्यता किती आहे याचा अंदाज लावू शकता. पुजारी आणि पंडितांना राहण्याकरिता बंगळुरुमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

४० एकरात रंगणार भव्य विवाह सोहळा

या लग्नाला जवळपास एक लाख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जे हळदी कुंकू ते लग्न सोहळ्यापर्यंत सर्व विधींमध्ये भाग घेतील. या लग्नात उपस्थित सर्व पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये केली गेली आहे. या शाही लग्नासाठी 40 एकर जमीन वापरली जात आहे, त्यामध्ये 15 एकर कार पार्किंग, 6 एकर जागेत जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित जागा विवाह समारंभासाठी वापरली जाईल.

दीपिका च्या लग्नातील मेकअप आर्टिस्ट आणि हेयर स्टाइलिस्ट

विशेष म्हणजे या लग्नाकरिता मेकअप आणि हेअर स्टाइलिस्ट कोण असेल याची उत्सुकता सर्वानाच आहे. तर या लग्नात रक्षिता आणि नातेवाईकांकरीता मेकअप आणि हेअर स्टाइलिस्ट ते असणार आहेत ज्यांनी दीपिका पादुकोण च्या लग्नात मेकअप आर्टिस्ट आणि हेयर स्टाइलिस्ट म्हणून काम केले आहे.

हा विवाह सोहळा भव्य आणि शाही बनविण्यासाठी सुमारे 300 लोक अहोरात्र काम करत आहेत. त्याच वेळी, सुमारे 200 फुलवाले लग्नाचे ठिकाण सजवण्यासाठी व्यस्त आहेत.