कर्नाटकात उद्या ‘सुपर ओव्हर’मध्ये कुमारस्वामी सरकारची ‘फ्लोअर टेस्ट’ ; SCने आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या सत्तेच्या खेळात आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला दिलासा देत या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवला आहे. सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार होता. त्यानुसार आज बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्याची संपूर्ण सूट ही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय सत्तासंघर्ष सुरु असून काँग्रेस आणि जेडीएस च्या काही आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते. मात्र त्यांनी या राजीनाम्यांवर काहीही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या आमदारांनी आपले राजीनामे मंजूर व्हावेत म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याविषयी निर्णय घेण्यास संगीतले असून आमदारांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही याचा निर्णय असुद्या किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई असूद्यात या सगळ्या प्रकरणात ते निर्णय घेऊ शकतात. चीफ जस्टिस रंजन गोगोई यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, विधानसभा अध्यक्ष नियमांच्या अधीन राहून सर्व प्रकारे निर्णय घेऊ शकतात.

१५ बंडखोर आमदारांकडे लक्ष-

यासंदर्भात कोर्टाने निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार असले तर उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी ते विधानसभेत यावेत की नाही हा पूर्ण निर्णय त्यांचा असणार आहे. त्याचबरोबर या ठरावात सहभागी व्हायचे कि नाही याचादेखील पूर्ण निर्णय ते घेऊ शकतात. त्यामुळे आता कुमारस्वामी यांच्या सरकारवरचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे आता उद्या विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी यांचे सरकार वाचते कि कोसळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी