जान्हवी कपूरसोबत ‘बागबान’चा रिमेक बनवणार कार्तिक आर्यन, चीनमध्ये होणार शुटींग !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून आपल्या पोस्टमुळं सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत आहे. अलीकडेच त्यानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळं तो चर्चेत आला आहे.

कार्तिक आर्यननं नुकताच इंस्टावरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्यानं त्याचा फोटो एज फिल्टर वापरून एडिट केला आहे. फोटो शेअर करतान त्यानं लिहिलं की, “लॉकडाऊनमध्ये वय वेगानं वाढत आहे. चला बागबानचा रिमेक बनवू या. हिरोईची कास्टींग सुरू आहे. प्लीज तुमची एन्ट्री पाठवा.”

जान्हवीला मागितला चीनचा व्हिसा

कार्तिकनं त्याचा पती पत्नी और वो सिनेमातील चिंटू त्यागीचा फोटो वापरला आहे. कदाचितच त्यानं विचार केला असेल की यावर कोणी इतकं रिअ‍ॅक्ट होईल. अनेक अभिनेत्रींनी कार्तिकला उत्तर द्यायला सुरुवात केली. जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांनीही कार्तिकच्या या पोस्टवर रिप्लाय दिला आहे. जान्हवी कपूरनं लिहिलं की, मी माझी एन्ट्री पाठवत आहे. आशा करते या रोलसाठी जास्त म्हातारी नाहीये. यावर कार्तिक म्हणतो, तुझ्याकडे चायनीज व्हिसा आहे का, कारण आपण चीनमध्ये शुटींग करणार आहोत.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय कार्तिक दोस्ताना 2 या सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दोघं पहिल्यांदात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

Work From Home they said

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like