‘या’ अभिनेत्रीला आईची भूमिका साकारायला प्रचंड आवडतं, ‘लव आज कल 2’ मध्ये केली होती ‘धमाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्रींना जास्त करून यंग लेडीच्या भूमिका करायलाच जास्त आवडतं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना पडद्यावर आईची भूमिका साकारायची म्हटलं की, त्यांना संकोच वाटतो. परंतु अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना आजही आईची भूमिका पडद्यावर साकारायला आनंद वाटतो. अशीच एक अभिनेत्री आहे ती म्हणजे कविता घई. पडद्यावर आईची भूमिका साकारून या अभिनेत्रीला खूपच आनंद मिळतो. याचा खुलासाही खुद्द कवितानंच केला आहे.

आपल्या आईच्या रोलबद्दल बोलताना बोलताना अभिनेत्री कविता घई म्हणते, “एकाच वेळी मला दोन ठिकाणी आईचा रोल करायला मिळतो याचा मला खूप आनंद आहे. मी दोन क्षेत्रात कार्तिकच्या आईची भूमिका साकारत आहे. लव आज कल मध्ये कार्तिकची आई आणि आमचा शो कार्तिक पूर्णिमा मध्ये हर्ष नागरच्या आईचा रोल. मला याचाही आनंद आहे की, सिनेमा आणि शो चांगलं सादरीकरण करताना दिसत आहे.” असंही तिनं सांगितलं. कार्तिक पूर्णिमा हा शो स्टार भारतवर प्रसारीत केला जातो.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच कविता लव आज कल 2 या सिनेमात दिसली. सिनेमात तिनं कार्तिकच्या आईचा रोल केला. तिच्या अभिनयाचं चाहत्यांनीही कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/B7Ut0jhBR8o/