बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचे आवाहन केले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं असे ट्विट करत दमानिया यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

ट्विटमध्ये दमानिया यांनी म्हंटले आहे की, ‘शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे. चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं.’

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Visit : policenama.com