राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘नथुराम गोडसे आणि PM मोदी यांची विचारधारा एक सारखीच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या ‘संविधान वाचवा’ मोर्चाच्या वेळी राहुल गांधी म्हणाले, नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे. यात फारसे अंतर नाही. परंतु, मी गोडसे यांचा भक्त आहे, असे बोलण्याची नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत नाही.

ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही या गोष्टीवर लक्ष्य द्या जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना बेरोजगारी आणि नोकरीबद्दल विचारता तेव्हा ते अचानक लक्ष विचलित करतात. एनआरसी आणि सीएएमुळे रोजगार मिळणार नाही, काश्मिरची परिस्थिती आणि आसाममध्ये होणारी जाळ-पोळ यामुळे युवकांना रोजगार मिळत नाहीये.

ते म्हणाले, ‘भारतीयांना ते भारतीय आहेत हे सिद्ध करण्यास सांगितले जाते. मी भारतीय आहे हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदी कोण आहेत? कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरविण्यासाठी परवाना कोणाला दिला आहे? मला माहित आहे की मी एक भारतीय आहे आणि मला ते सिद्ध करण्याची गरज नाही.