अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील ‘या’ 6 प्रॉपर्टी विक्रीस, सर्वात मोठा लिलाव असल्याची चर्चा

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – केद्र सरकारने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके़ आणि खेड शहर तसंच तालुक्यातील लोटे येथील जवळपास 6 मालमत्तांचा लिलाव येत्या 10 नोव्हेंबरला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आतापर्यंतच्या लिलावापैकी हा सर्वात मोठा लिलाव असल्याचे बोलले जात आहे.तस्करी आणि विदेशी विनिमय हाताळणी कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे

केंद्र सरकारने दाऊद इब्राहिमवर कारवाई करताना 2018 साली त्याच्या मालमत्तेचा लिलावास सुरुवात केली. त्यानुसार मुंबईतील मालमत्तेचा लिलाव पहिल्यांदा केला होता. लिलावात मोठी बोली लावण्यात आली होती. सुमारे 3.51 कोटी रुपयांस या मालमत्तेचा लिलाव झाला होता. सैफ बुरहानी अपल्फिमेंट ट्रस्टने या जागेसाठी सर्वाधिक बोली लावली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी येथील जवळपास मालमत्तांचा लिलाव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केला जाणार आहे. रत्नागिरी येथील मुंबाके गावात ही मालमत्ता असून या ठिकाणी दाऊदच्या नावावर अनेक जमिनी आणि घर असल्याचे सांगण्यात आलं आहे.

लिलाव होणा-या मालमत्ता
जमीन – राखीव किंमत
29.30 गुंठा – 2 लाख 23 हजार 300
27 गुंठा – 2 लाख 5 हजार 800
24.90 गुंठा – 1 लाख 89 हजार 800
30 गुंठा जमिनीवर असलेले घर – 6 कोटी 14 लाख 8 हजार 100
20 गुंठा – 1 लाख 52 हजार 500
18 गुंठा – 1 लाख 38 हजार