राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाचालकाचे अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी खैरणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी या परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

खैरणे येथे राहणाऱ्या सुफियाना शेख या रिक्षाचालकाचे अपहण करून मारहाण करण्याचा प्रकार  २ नोंव्हेंबर रोजी खैरणेतील रिक्षा स्टॅण्डवर घडला होता. सुफियांना हा तिथल्या स्टॅण्डवर रिक्षा घेऊन गेलेला. यावेळी तिथल्या काही तरुणांनी सुफियाना याला स्टॅण्डवर रिक्षा लावण्यास विरोध केला.

यानंतर त्याला नगरसेवक मुलांवर पटेल यांच्या कार्यालयात नेले असता त्याठिकाणी मुनावर पटेल व त्यांच्या सहकाºयांनी जबर मारहाण  केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार सुफियानाच्या आई साहिदा शेख यांनी कोपर खैरणे पोलिसांकडे केलेली. परंतु कोपर खैरणे पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलीस आयक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केलेली. त्यानुसार नगरसेवक पटेल व इतर आठ जणांविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मुनावर यांनी हा आरोप फेटाळून लावत आपल्याला गुंतवण्याचे षडयंत्र झाल्याचा आरोप केला आहे.

या प्रकारामुळे खैरणे परिसरात सोमवारी रात्रीपासून तणाव निर्माण झालेला. मुनावर यांच्या विरोधी गटाने शेख कुटुंबाला मदत केल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरून पूर्ववैमनस्य असलेले हे दोन्ही गट समोरासमोर येऊन दंगा होण्याची  शक्यता असल्याने खैरणे  परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.