Kirit Somaiya | ‘शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ठाकरे सरकारला (Thackeray government) घेरात आणणारे आणि सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचा (Shiv Sena) एक नेता आणि राष्ट्रवादीचा (NCP) एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आता हे दोन मंत्री कोण? यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे की, माझ्याकडे 2 गठ्ठे आहेत.
पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने आहेत.
त्यात ठाकरे सरकारच्या (Thackeray government) एका नेत्याचा घोटाळा आहे.
दुसरा जो गठ्ठा आहे त्यात 4 हजार पानं आहेत.
तो शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत चर्चा करणार आहेत.
त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता.
तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे.
त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं ते म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणाले की, उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये.
ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली.
त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना ‘चार दिन की चांदनी’ असं वाटतं. 5-15 दिवस त्यांना शेरोशायरी करू द्या, असा चिमटा सोमय्या यांनी काढला.
या मुद्द्यावरुन त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना घेरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ज्या कारणामुळे तुरुंगात डांबले, ती केस अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की एवढ्या उड्या मारू नका.
120 कोटी रुपये रोख दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते.
तर कुठल्या नवनाथ घोटाळ्याचे होते ते सांगा, असे ते म्हणाले.

 

दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad Pawar and Uddhav Thackeray) यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, ‘चार दिन की चांदनी’ आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली 5 वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचं नाही. कारण ही लूट आहे. शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता तो राजमहल कुणाचा ते सांगा? असा जोरदार प्रश्न देखील सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | kirit somaiya taunt chhagan bhujbal over maharashtra sadan case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | दहशत पसरवणाऱ्या सार्थक मिसाळ गँगवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Murder in Pune | पुण्यात कोयत्याने सपासप वार करुन चिकन दुकानदाराचा खून; बोपोडी परिसरातील घटना

Saki Naka Rape Case | ही घटना दुर्दैवी; साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 1 महिन्यात – CP हेमंत नगराळे