Kishori Pednekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरे हिंदुत्वाचं कार्ड चालवत आहेत’; किशोरी पेडणेकरांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) महाराष्ट्र दिनादिवशी म्हणजेच 1 मेला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Kishori Pednekar on Raj Thackeray) ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

मनसे हा मुळात भाजपचा चेहरा असून ओंगे, भोंगे आणि सोंगेच्या माध्यमातून भाजपचे (BJP) चेहरे बाहेर आले आहेत. मनसे आणि भाजप विकासाचं राजकारण करू शकत नाहीत म्हणून ते हिंदुत्वाचं कार्ड चालवत असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेवरूनही टीका केली आहे.

 

हिंदुत्त्वाची मंदिरे जास्त असून मनसेच्या या भूमिकेमुळे आरत्या किंवा भजन यांना रोख लावायचं काम त्यांनी केलं असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील लोक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत.
उद्धव ठाकरेंनी कधी भडकावू भाषणे केली नाहीत, त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला संयमी नेतृत्त्व मिळालं असल्याचं पेडणेकर म्हणाल्या.

 

दरम्यान, वारसा हक्क मुलांनाच मिळतो, वडिलांनी केलेली चांगली वाईट कर्म मुलालाच मिळतात ना?,
तुम्ही तुमची संपत्ती तेजस ठाकरेंच्या (Tejas Thackeray) नावावर करणार आहात?,
असा सवाल करत पेडणेकरांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला.

 

Web Title :- Kishori Pednekar on Raj Thackeray | kishori pednekar criticized mns president raj thackeray over his aurangabad rally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahendra Singh Dhoni CSK Captain | महेंद्र सिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ, जडेजाचा तडकाफडकी राजीनामा !

 

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

 

Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!

 

DG Insignia Award Maharashtra Pune Police | पुणे आणि शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस आस्थापनेवर अधिकारी आणि अंमलदार यांना महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर