जोतिष : ‘शनी’चं रत्न आहे ‘नीलम’ ! ‘परिधान’ करण्यापूर्वी जाणून घ्या ‘त्या’ बाबतचे ‘हे’ 7 नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिषशास्त्रात नीलम रत्नाचे खूप मोठे महत्व आहे, ज्योतिशशास्त्र सांगते की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला यातून सकारात्मक परिणाम मिळतो तेव्हा तो व्यक्ती राजा बनतो आणि जर वाईट प्रभाव सुरु झाला तर राजा देखील भिकारी बनतो. शनि दोष काढून टाकण्यासाठी आणि शनि ग्रहाच्या शांतीसाठी नीलम रत्न घातले जाते. मात्र, याची तपासणी करून आणि एखाद्या चांगल्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार ते परिधान केले पाहिजे. जर एखादा व्यक्ती नीलम घालत असेल आणि या 7 गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या असतील तर हे नीलम त्याच्यासाठी योग्य नाही हे समजून घ्या.

या आहेत त्या 7 महत्वाच्या गोष्टी
नीलम रत्नाचा परिणाम अतिशय वेगवान दिसतो. जर हे रत्न आपल्यासाठी अनुकूल नसल्यास, म्हणजेच ते आपल्याला सकारात्मक परिणाम देत नसेल, तर डोळ्यांना त्रास होऊ लागतो.

नीलम जर सकारात्मक असेल तर एखाद्या अपघातात जखम होऊ शकते आणि शारीरिक त्रास देखील होऊ शकतो.

नीलम परिधान केलेल्या व्यक्तीसाठी शुभ नसेल तर त्या व्यक्तीला लगेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

नीलम अनुकूल नसेल तर भयानक आणि भीतीदायक स्वप्न पडतात.

जे लोक निलमसाठी अनुकूल आणि शुभ आहेत त्यांना नीलम घालताच शुभ परिणाम देण्यास सुरुवात करतो. सर्व प्रथम, जर आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर आराम मिळेल.

नीलम शुभ असेल तर परिधान करणाऱ्याला लगेच आर्थिक फायदा होतो तर नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत देखील मिळतात.

नीलम घातल्यानंतर जर तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडली नाही तर समजून घ्या की हे रत्न तुमच्यासाठी लाभदायक आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/