प्रायव्हेट पार्टवर तीव्रतेनं खाज येण्याची ’ही’ असू शकतात कारणं, अशी 5 प्रकारे घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकदा प्रायव्हेट पार्ट्सवर खाज येण्याची समस्या होते. अशावेळी काहीही सूचत नाही. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा रोगाची मोठी समस्या होऊ शकते. फंगल इन्फेक्शन, यीस्ट इन्फेक्शन, लाल चट्टे, पांढरं पाणी येणं अशा समस्यांमुळे त्वचेवर तीव्रतेने खाज येते. या आजारांपासून दूर राहाण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात…

हे उपाय करा

1 कोरफडीचा गर काढून तो इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावल्याने खाज सुटणार नाही आणि त्वचेची आग होणार नाही.

2 दिवसभर भरपूर पाणी प्या. संतुलित आहार घ्या.

3 मासिक पाळीत स्वच्छता ठेवा, सतत सॅनिटरी पॅड बदलत राहा.

4 दह्याच्या सेवन करा, यामुळे शरीरातील सकारात्मक बॅक्टेरिया वाढतात. इन्फेक्शन कमी होते.

5 तज्ज्ञांच्या सल्ल्याने इन्फेक्शनच्या ठिकाणी दालचिनी तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावा. हे सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालत नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्या.