दुसर्‍याने ‘जांभई’ दिल्यास आपल्यालाही का येते जांभई, जाणून घ्या ‘रिसर्च’मधील ‘ही’ 6 कारणे

पोलीसनामा ऑनलाइन  – समोरच्या व्यक्तीला जांभई आली की तुम्हाला येते, असा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल. हा प्रकार कुठेही घडू शकतो. ऑफिसमध्ये, बसस्टँडवर, रस्त्यावर कुठेही असे तुमच्याबाबतीत घडू शकते. असे का होते, आणि जांभई येण्यामागचे कारण काय, ते जाणून घेऊयात.

एकमेकांना पाहून जांभया देणं ही लोकांच्या भावनीक स्थीतीशी निगडीत असणारी गोष्ट आहे, असे पूर्वी मानले जात होते. पण 2014 च्या एका संशोधनात हे कारण चुकीचे असल्याचे म्हटले गेले. द ड्यूक सेंटर फॉर ह्यूमन जीनोम व्हेरिएशनने 2014 मध्ये यावर संशोधन करण्यात आले.

संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष

1 वाढत्या वयात एकमेकांना बघून जांभया येण्याची शक्यता कमी होत जाते.

2 शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेने जांभया येतात. त्यामुळे नाकाने दिर्घ श्वास घेऊन तोंडाने हळूहळू हा श्वास सोडल्यास जांभया कमी होण्यास मदत होते.

3 इतरांना बघून जांभया देणं हे फक्त काही काळासाठी असतं तसंच जसजसे वय वाढत जाते तसतसे ही सवय जाते.

4 काही व्यक्ती जांभई देण्याच्या बाबतीत खूपच असंवेदनशील असतात. त्यांना कोणत्याही वातवरणात जांभई यायला वेळ लागतो.

5 प्रत्येकाची शारीरिक स्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला जांभया येण्याची कारणं वेगवेगळी सुद्दा असू शकतात.

6 हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळेदेखील जास्त जांभया येतात. हृदय आणि फुफ्फूसं योग्य काम करत नाही तेव्हा दम्याचा आजारही असू शकतो.