सर्वसामान्यांना आणि अर्थव्यवस्थेला ‘कसा’ आणि ‘किती’ फायदा होणार इलेक्ट्रिक ‘हाय-वे’, जाणून घ्या

नवीदिल्ली  : वृत्तसंस्था – आतापर्यंत तुम्ही रस्त्यावरून पेट्रोल डिझेलने चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील किंवा जास्तीत जास्त तारांनी जोडलेल्या रेल्वे गाड्या पाहिल्या असतील मात्र आता सरकार इलेक्ट्रिक हायवेची निर्मिती करणार आहे. ज्यावर मोठे ट्रक आणि कारदेखील इलेक्ट्रिक पद्धतीने धावू शकणार आहेत. याच प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी पुढील महिन्यात स्वीडनला जाणार आहेत. तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांनी देखील पुढे यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

चौथ्या वर्षी पासून वसूल करणार टोल
या हायवेच्या बाजूला सर्व झाडे लावली जातील तसेच यासाठी आरबीआय मदत करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. त्यांनी सांगितले की पहिली तीन वर्ष प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरची याठिकाणांहून प्रवास मोफत असेल मात्र चवथ्या वर्षांपासून टोल आकारण्यात येईल. नितीन गडकरी यांनी सांगितले की, ऑटो जगतातील कंपन्या इलेक्ट्रिक हायवेसाठी खास बस आणि कार बनवत आहेत.

खर्च कमी व्हावा म्हणून निवडला ग्रामीण भाग
या प्रकल्पासाठी कमी खर्च लागावा म्हणून ग्रामीण भागाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे अनेक नवीन फायदे होणार आहेत ज्यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

हायवेमुळे अनेक भागांचा होणार विकास
इलेक्ट्रिक हायवे नवी दिल्‍ली, गुड़गांव, अलवर, भरतपुर, सवाई माधोपुर, कोटा, झाबुआ, वडोदरा वरून मुंबईला पोहचेल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातून हा हायवे जाणार असल्यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या हायवेमुळे मोठा रोजगार आणि नवीन व्यावसायिकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

माल वाहतुकीला मिळणार चालना
मुंबई दिल्ली अशी माल वाहतूक करण्यासाठी या आधी इंधनावरच खूप खर्च करावा लागत असे मात्र आता इलेक्ट्रिक  ट्रक आणि बस आल्यावर हा खर्च खूप कमी होणार आहे आणि यामुळे फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

प्रदूषणापासून मिळणार मुक्ती
संपूर्ण देशभर प्रदूषण ही मोठी समस्या बनत चालली आहे. सर्व देश ग्लोबल वार्मिंगबद्दल चिंतित आहेत. गेल्या वर्षी स्वीडनच्या तरूण पर्यावरणीय कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) भाषण करताना संपूर्ण जगाच्या नेत्यांची प्रदूषणाबद्दल खिल्ली उडविली होती. थनबर्ग म्हणाले की तरुण पिढी तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही.

भारतात देखील प्रदूषणाची मोठी समस्या आहे त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. अशात इलेक्ट्रिक हायवे हा एक चांगला पर्याय ठरू शकणार आहे. ज्यामुळे प्रदूषणाशी लढण्याची ताकद मिळेल आणि अर्थव्यवस्था देखील सुधारेल.

दिल्ली – मुंबई दरम्यान बनत आहे इलेक्ट्रिक हायवे
गडकरी म्हणाले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक हायवे मार्गाची योजना आहे. या एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात ई-महामार्ग पाहण्यासाठी स्वीडनला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी महामार्गांना ई-महामार्गामध्ये रूपांतरित करण्यासाठी गुंतवणूक करावी यासाठी अनेक कंपन्यांना आमंत्रित केले आहे.

एसबीआय कर्ज देण्यासाठी तयार
एसबीआय सोबत या प्रकल्पासाठी आणखी पाच बँक कर्ज देण्यासाठी तयार आहेत. गडकरींनी सांगितले की, चालू वर्षांमध्ये एनएचएआयचे वार्षिक उत्पन्न 40,000 कोटी रुपये होईल आणि आगामी वर्षांमध्ये हे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल.