फायद्याची गोष्ट ! 500 आणि 2000 रूपयाच्या ‘कुजलेल्या-फाटलेल्या’ नोटा बदलल्यास ‘एवढे’ मिळतील पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आपल्याकडे जुन्या आणि फाटक्या नोटा असल्यास काळजी करण्याचं कारण नाही. कारण आपण आपल्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत जाऊन त्या नोटा बदलू शकता. त्यासाठी कोणतीही बँक शाखा नोटा घेण्यास नकार देऊ शकत नाही. कारण सर्व बँकांना त्यासाठी बांधील केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नोटांच्या बदलीसाठी बँकांना एक बोर्डही बसवावा लागणार आहे. फाटलेल्या नोटच्या उर्वरित भागाच्या आधारे बँका परतावा देतील. जाणून घेऊया यासंबंधी सर्व महत्वाच्या गोष्टी …

आपण २०००, ५०० आणि २०० रुपयांच्या नवीन फाटलेल्या नोटा सहजपणे बदलू शकता. फाटलेल्या आणि खराब नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आरबीआय नोट परतावा नियम २००९ मध्ये बदल केले आहेत. त्याअंतर्गत आता आपण १, २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा बदलू शकता. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार फाटलेल्या नोटच्या उर्वरित भागानुसार बदलाचा दर निश्चित केला जाईल.

कोणत्या नोटवर किती पैसे मिळतील ?
– नवीन २००० च्या नोटच्या एकूण १०९.५६ चौरस सेंटीमीटर क्षेत्रापैकी ८८ चौरस सेंटीमीटर दिल्यावर पूर्ण परतावा देण्यात येईल, तर ४४ चौरस सेंटीमीटरवर अर्धा परतावा मिळेल.

– नवीन ५०० रुपयांच्या नोटचा आकार ९९ चौरस सेंटीमीटर आहे. यापैकी ८० चौरस सेंटीमीटर दिल्यास संपूर्ण परतावा देण्यात येईल. त्याच वेळी, ४४ चौरस सेंटीमीटर जमा केल्यावर अर्धा परतावा देण्यात येईल.

– नवीन २०० रुपयांच्या एकूण ९६.३६ चौरस सेंटीमीटरपैकी ७८ चौरस सेंटीमीटरवर नोटाचा संपूर्ण परतावा देण्यात येईल. तर किमान अर्धा परताव्यासाठी, नोटचा किमान ३९ चौरस सेंटीमीटर भाग द्यावा लागेल.

– १०० रुपयांच्या नवीन नोटच्या ९३.५२ चौरस सेंटीमीटर क्षेत्रापैकी ७५ चौरस सेंटीमीटर दिले तर संपूर्ण परतावा देण्यात येईल. त्याचबरोबर ३८ चौरस सेंटीमीटर क्षेत्रासाठी अर्धा परतावा दिला जाईल.

– नवीन ५० रुपयांच्या नोटच्या ८९.१० चौरस सेंटीमीटर आकाराच्या ७२ चौरस सेंटीमीटरभाग दिल्यास संपूर्ण परतावा मिळेल. त्याचबरोबर नोटका ३६ चौरस सेंटीमीटर भाग दिल्यास अर्धा परतावा देण्यात येईल.

Visit : Policenama.com